Posts

Showing posts from December, 2023

निश्चित ध्येय

Image
  निश्चित ध्येय तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कुठे पोहचाल कोणास ठाऊक.      यशस्वी होण्यासाठी जी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे ध्येयाचा निश्चितपणा. आपल्याला काय पाहिजे याचं स्पष्ट ज्ञान. कारण त्याशिवाय बाकीचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.      स्पष्टता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. जे लोक अतिशय प्रभावीपणे काम करतात त्याचं सर्वात प्रमुख कारण हेच असतं की त्यांचं उद्दिष्ट त्यांच्यासमोर बिलकुल स्पष्ट असतं.      जे लोक यशस्वी होतात ते एक निश्चित ध्येय समोर ठेवून मेहनत करतात.      तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे माहीत असल्याशिवाय ते मिळणार कसं? निश्चित ध्येयच समोर नसेल तर जाणार कुठे? आणि तरीही कोणी गेला तरी पोहोचणार कुठे?      समुद्रप्रवासावर निघालेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाला माहीत असतं की आपल्याला कुठे जायचं आहे. त्यामुळेच समोर ते इच्छित ठिकाण बहुतांश वेळ दिसत नसतानाही तो जात राहतो आणि अखेर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो.      ध्येय स्पष्टपणे ठरवून कागदावर लिहून घे...