Lesson No. 06.1 Cutting Tools ( कटिंग टूल्स )
6.१. कटिंग टूल्स (Cutting Tools) - कापण्याची साधने
फाइल :-धातू कापण्याच्या पध्दती [ Methods of meterial cutting] :- धातू कट करण्याच्या तीन पध्दती आहेत.
1] खरडणे [ abrasion]
2] वितळवणे [ Fusion]
3] कापणे [Incision]
फाइल व फाइलींग :- फाइल हे कटिंग टूल असून फाइलचा
उपयोग पृष्ठभागा वरील जादा धातू काढणे, जॉब योग्य साईजमध्ये आणणे व त्याला फिनिशिंगमध्ये बनविणे, जॉबची बर काढणे यासारख्या कामासाठी होतो.
फाइलींग ही फाइलच्या मदतीने जॉबच्या सरफेसवरील जादा असलेले मटेरीयल काढण्यासाठी क्रिया आहे. [Filing is method for removing excess material from workpiece by using a file which acts as cutting tool]
फाईलचे भाग [ ELEMENTS OF FILE ] :-
फाईलचे पुढील वेगवेगळे पार्ट आहेत.
1) पॉईंट [Point] किंवा टीप [Tip] :-
टॅगच्या विरुध्द बाजूस (टोकास) असणाऱ्या भागास टीप किंवा पॉईंट म्हणतात. फाइलींगला सुरुवात करण्यापूर्वी
जॉबच्या सरफेसवरील बल्क मटेरिलय (Bulk material) किंवा हार्ड स्किन (Hard skin) याने काढतात. फाइलींग करतांना पॉईंटवर एका हाताने दाब देतात.
2) फेस [Face] किंवा साईड [Side] :- फाईलच्या ज्या रुंद भागावर दाते पाडलेले असतात. त्याला फेस किंवा साईड म्हणतात. [The broad part of file with teeth cut on its surface is known face or side]
3) एज [ Edge] :- फाईलच्या फेसच्या कडा म्हणजे एजेस. यावर समांतर दाते एका रांगेत असतात. [The thin part of the file with a single row of parallel teeth] दाते नसलेल्या एजला सेफ एज म्हणतात.
4) हील [Heel] :- फाईलच्या फेसच्या दाते नसलेल्या
भागात हील म्हणतात. [The portion of the broad part without teeth is known heel] यावर फाईलची ग्रेड, कंपनीचे नांव कोरलेले असते.
5) शोल्डर [Shoulder] :- फाईलची बॉडी आणि टॅग यांना जोडणारा वक्रकार भाग म्हणजे शोल्डर किंवा टँगला बॉडीपासून वेगळा करणारा वक्राकार भाग म्हणजे शोल्डर होय [The curved part of the file separating tang from body is called shoulder]
6) टंग [Tangj :- फाइलच्या ज्या भागावर हॅण्डल बसवितात त्या अरुंद व निमूळल्या भागास टॅग म्हणतात. The nar-row and thin part of a file fits into the handle is known tang] : टॅगवर हार्डनिंग व टेम्परींग केलेले नसते म्हणजेच ती सॉफ्ट ठेवलेली असते.
7) हॅण्डल [Handle] :- फाईल पकडण्यासाठी टँगवर
बसविलेल्या भागास हॅण्डल म्हणतात.
8) फेरुल [Ferrule] :- हॅण्डल क्रॅक होऊ नये यासाठी
हँडलवर जी धातुची रिंग बसवलेली असते तीला फेरुल म्हणतात. [A protective metal ring to prevent handle from cracking is called ferrule]
9) बेली पोर्शन [Belly porion] :- काही फाईलस त्यांच्या
पूर्ण लांबीच्या '/, पर (0.33 पर) असले पॉईंटकडे रुंदीला निमुळत्या असतात. त्याला बेकी पार्शेन म्हणतात.
बेली पोर्शनमुळे फाईलींग करतांना फाईलच्या रुंदीपेक्षा कमी साईजच्या गाळ्यात फाईलींग करता येते तसेच फाईलचा बॅलन्स सांभाळला जातो.
धातू [Material] :- सर्वसाधारणपणे फाईल हाय कार्बन
स्टील किंवा हाय ग्रेड कास्ट स्टील पासून बनवितात.
फाईलच्या बॉडीवर हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असते.
[The body portion is hardened and tempered] टॅगवर हार्डनिंग केलेले नसते.
फाईलचे कट [Cut of file] :-
व्याख्या [Definition) :- फाईलच्या फेसवर असणाऱ्या दात्यांच्या रचनेला कटस् ऑफ फाईल म्हणतात.
फाईलच्या पृष्ठभागावर असणारे दाते हे कट्स पाडून तयार केलेले असतात. [The teeth of a file are formed by cuts made on its face] वेगवेगळ्या कटस्च्या फाईल वेगवेगळ्या कामासाठी वापरतात.
प्रकार [Types] :- कटस्चे पुढील चार मूलभूत प्रकार आहेत.
1) सिंगल कट 3) रास्प कट
2) डबल कट 4) कर्व्हड् कट
1) सिंगल कट [ Single cut] :- सिंगल कट फाईलच्या पृष्ठभागावर असणारे दाते एकाच दिशेने पाडलेले असतात. [ A single cut file has rows or teeth cut in one direction across the face]
फाईलच्या सेंटर लाईनशी या दात्यांच्या कोन 60° असतो. या फाईलच्या काटनुसार जादा रुंद (as wide as) चिप्प निघतात.
सिंगल कट फाईलचा उपयोग ब्रास, अॅल्युमिनिअम ब्रांझ व कॉपर यासारखे सॉफ्ट मटेरियल फायलींग करण्यासाठी होतो.
रास्प कट फाईल फक्त हाफ राऊंड आकारात मिळतात. [Rasp cut files are available only in half-round shape]
4) कर्व्हड कट [Curved cut]:- कव्र्व्हड् कट फाईलची कापण्याची समता जास्त खोलवर असते [Curved cut files has deeper cutting action]
या कटला व्हिक्सन कट [vixen cut] ड्रेड नॉट कट [dread naught cut] मिल्ड कट [mild cut] किंवा सर्क्युलर कट असेही म्हणतात.
ही फाईल अॅल्युमिनिअम, टीनं, कॉपर व प्लॅस्टिक सारखे नरम (Soft) मटेरियल फायलींग करण्यास उपयुक्त असते.
कर्व्हड् कट फाईलच्या फेसवर असणारे दाते वक्राकार असतात. दात्यांच्या बहिर्गोला कारपणा पॉईंण्टच्या बाजूस असतो.
कर्व्ह कट फाईल फक्त फ्लॅट आकारात मिळतात. (The curved cut files are available only in flat shape]
कटची निवड [Selection of cuts]:- फायलींग करण्यासाठी ठराविक कटची फाईल निवडणे हे फायलींग करावयाच्या मटेरियलवर अवलंबून असते.
(The selection of a file with particular types of teeth is based on the material to be filed]
सिंगल कट फाईल्स सॉफ्ट मटेरियल फायलींग करण्यास वापरतात जादा धातू काढण्यास व रफ कामात डबल कट फाईल उपयुक्त असते.
काही फाईल्स कि ज्या सॉला [Saw] ला शार्पनिंग करण्यास वापरतात. त्या सिंगल कट असतात.
फाईलच्या ग्रेडस व स्पेसिफिकेशन | GRADS AND SPECIFICATION]:-
व्याख्या | Types] :- फाईलच्या फेसवर प्रति सेंटीमीटर
अंतरात असलेल्या दात्यांच्या संख्येला ग्रेडस् ऑफ फाईल म्हणतात.
फाईलच्या ग्रेडस् दात्यांमधील अंतरानुसार ठरवितात, [File grades are determined by the spacing of the teeth] गरजेनुसार फाईलस वेगवेगळ्या ग्रेडस्च्या बनवितात.
प्रकार [ Types] :-
1) रफ [Rough]
2) बास्टर्ड [Bas-tard]
3) सेकंड कट [Second cut]
4) स्मुथ [Smooth]
5) डेड स्मुथ [Dead smooth]
1) रफ [Rough] :-
रफ ग्रेडच्या फाईलवर प्रति सेंटीमीटर अंतरातील दात्यांची संख्या कमी असते. दाते आकारने मोठे असतात. दात्यांमधील अंतर [Spacing] जादा असते. रफ फाईल मटेरीयल जास्त प्रमाणात व जलद काढण्यासाठी वापरतात. ही फाईल प्रामुख्याने नरम धातूंच्या कास्टींगच्या रफ कडा काढण्यास वापरतात. [Rough file is mostly used for trimming the rough edges of soft metal casting]
2) बास्टर्ड [Bastard ] :-
बास्टर्ड फाईलच्या फेसवर रफ * फाईलपेक्षा प्रति सेंटीमीटर मध्ये दात्यांची संख्या जादा असते. बास्टर्ड फाईलचा उपयोग जास्त प्रमाणात धातू काढण्यासाठी होतो. [A bastard file is used in cases where there is a heavy re-duction of material]
3) सेंकड कट [Second cut] :-
सेंकड कट ग्रेडच्या फाइलवर बास्टर्ड फाईलपेक्षा दात्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे दात्यांचा आकार व दात्यांमधील अंतर [Spacing of teeth] कमी असते.
सेंकड कट फाईल धातूला चांगले फिनिशिंग येण्यासाठी वापरतात. सेकंड कट फाईल कठीण धातू फायलिंग करण्यासाठी उत्कृष्ठ आहे. [Second cut file is excellent to file hard metals] ही फाईल जॉबला फिनिशिंग साईजच्या जवळ आणण्यासाठी वापरतात. [Second cut file is use ful for bringing the jobs
close to the finishing size]
४) स्मूथ [Smooth ] :-
सेकंड कट फाईलपेक्षा दात्यांची संख्या जास्त असते, त्यामुळे दात्यांचा आकार व दात्यांमधील
अंतरही कमी असते. स्मुथ फाईलचा उपयोग कमी प्रमाणात मटेरियल काढून जॉबला चांगल्या प्रकारचे फिनिशिंग आणण्यासाठी वापरतात. [Smooth file is used to remove small quan-tity of material and to given a good finish]
५) डेड स्मूथ [Dead smooth ]:-
या ग्रेड च्या फाईलवर प्रति सेंटीमीटरमधील दात्यांची संख्या वरील स्मूथ ग्रेडपेक्षाही जादा असतो डेड स्मुथ फाईलचा उपयोग जॉब तंतोतंत साईज मध्ये व अतिशय उच्च दर्जाचे फिनिशिंग आणण्यासाठी वापरतात [A dead smooth file is used to bring to accurate size with a high degree of finish] एकच ग्रेड असलेल्या आणि वेगवेगळ्या साईज असलेल्या फाईल्सवर वेगवेगळ्या साईजचे दाते असतात. [Differ-ent sizes of files with the same grade will have varying sizes o teeth] लांबी जास्त असलेल्या फाईलच्या फेसवर असलेल्या दात्यांमधील अंतर जास्त असते. [In langer files, the teeth will be coarser]
बास्टर्ड, सेकंड कट, स्मूथ व डेड स्मूत या ग्रेडच्या फाईल जास्त प्रमाणात वापरल्या जातात. [The most used grandes of files are bastard, second cut, smooth and dead smooth] या ग्रेडस् ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने शिफारस केल्या आहेत. [These are the grades rec-ommended by the Bureau of Indian standard (BIS)
तपशिल | Specification] :- फाईलचे स्पेसिफिकेशन
तीची लांबी, ग्रेड कट व आकार यानुसार करतात. [Files are specified according to their length, grade, cut and shape]
फाईलची लांबी ही टिपपासून ते हील पर्यंतचे अंतराइतकी असते. [Length of file is the distance from the point (tip) to the heel]
फाईलचा बर्हिगोलाकारपणा [Convexity of file] :-बहुतेक फाईलचा पृष्ठभाग लांबीमध्ये जाडीला किंचित निमुळता होत गेलेला असतो यालाच फाईलचा बहिंगोलाकार पणा म्हणतात. [Most files have the faces slightly bellied length wise this is known as convexity of a file.] फाईलचा बहिंगोलाकारपणा म्हणजे टेपर ऑफर फाईल (बेली पोर्शन) नव्हे हे लक्षात ठेवावे.
फ्लॅट फाईलचा पृष्ठभाग बर्हिवक्र असून तो रुंदीला व जाडीला किंचीत टेपर असतो. [ A flat file has faces which are convex and it also tapers slightly in width and thickness] उद्देश [Purpose): जर फाईल जाडीला समांतर असती तर सरफेसवरील सर्व दाते जॉबच्या पृष्ठभागावर संपर्कात येऊन त्यांनी कापण्याची क्रिया केली असती. त्यामुमे फाईलवर जास्त दाब देण्याची गरज भासली असती व फायलींग करतांना पुढील बाजूस फाईल नेतांना जादा जोर [ Forward pres-sure] द्यावा लागला असता परंतु बर्हिगोलाकरपणामुळे हे टाळले जाते. सारख्या जाडीच्या फाईवर नियंत्रण ठेवणे जादा कठिण जाते. [ It is more difficult to control a file of uniform thickness] बर्हिगोलाकारपणामुळे नियंत्रण ठेवणे सोपे जाते. समांतर जाडीच्या फाईलने फ्लॅट पृष्ठभाग फायलींग करतांना प्रत्येक स्ट्रोक सरळ द्यावा लागला असता परंतु हाताच्या खाली वर [See-saw action) होणाऱ्या हालचालीमुळे ते शक्य झाले नसते. जर फाईल समांतर पृष्ठभागाची बनवली असती तर उष्णतोपचार करतेवेळी एक पृष्ठभाग वाकला जाऊन तो पृष्ठभाग अंतर्वक्र बनला असता आणि त्याचा उपयोग फायलींग करण्यासाठी झाला नसता. [If the file is made with parallel faces, while giving heat treatment one face may warp and become concave and the file will be useless for flat filing] जॉबच्या समोरील अथवा पुढच्या कडांच्या जादा चिप्स (मटेरीयल) निघण्याचे टाळले जाते व फ्लॅट सरफेस फायलींग करणे बर्हिगोलाकारपणामुळे सोपे होते [Exces sive chip removal at the front or rear workpiece edge is prevented and filing of the flat surface is made easier because of the convaxity on the cutting faces] फाईलचे आकार [ FILE SHAPES] प्रकार [Types] :- वेगवेगळ्या आकाराचे जॉब [Compo-
10) पिलर फाईल [Piller file] :- पिलर फाईलचा क्रॉस
सेक्शन आयताकृती असतो. हिलपासून पॉईंटपर्यंत रुंदी सारखीच असते. परंतु हीची जाडी हॅण्ड फाईलपेक्षा जादा व रुंदी कमी असते. तसेच एका एजवर दाते नसतात.
हँड फाइल वापरता येत नाही अशा ठिकाणी स्क्वेअर गाळे, कि वे फाईलींग करण्यास वापरतात.
फाईलींगच्या पध्दती [ FILING METHODS]
फाईलींग करण्यासाठी उपयोगात आणली जाणारी फायलींगची पध्दत ही फायलींग करावयाच्या सरफेसच्या पुढील घटकांवर अवलंबून असते.
1) फाईलींग करावयाच्या सरफेसची रचना (आकार) [Surface profile to be filed.]
2) पृष्ठभागाचे आवश्यक असणारे सरफेस फिनिश [type of surface texture required]
3) काढावयाच्या मटेरियलचे प्रमाण. [amount of material to be removed]
फायलींगचे पुढील प्रकार आहेत.
1) डायगोनल फाईलींग
2) ट्रान्राव्हर्स फाईलींग ( स्ट्रेट फाइलिंग )
3) लॉगीट्युडीनल फाईलींग ( स्ट्रेट फाइलिंग )
4) प्रो फाईलींग
5) ड्रॉ फाईलींग
डायगोनल फईलींग | Diagonal filing] :-
ज्यावेळेस जॉबचे मटेरियल मोठ्या प्रमाणात काढावयाचे असते त्यावेळेस डायगोनल फायलींग ही पध्दत वापरतात. [Di-
agonal filing is done when heavy reduction of materials to be removed.] फायलींग स्ट्रोक हा 45° च्या कोनात असतो. म्हणजेच फायलींग जॉबच्या कर्णाच्या दिशेने करतात. फाइलींग करुन तयार होणाऱ्या सरफेसवर उंच व खोलगट भाग स्पष्ट दिसतात.
[Because the stroke directions cross each other the surface terture formed can clearly indicate high and low spots] स्ट्रेट एजने वारंवार फ्लॅटनेस किंवा लेव्हल तपासण्यासाठी गरज नसते.
2) स्ट्रेट फाईलींग :
या फाईलींगचे पूढील दोन प्रकार आहेत.
i) ट्रान्सव्हर्स फाईलींग [ Transverse filing] :-
या पध्दतीत फाईलचा स्ट्रोक हा जॉबच्या जादा लांबीच्या बाजूस काटकोनात असतो. [In transeverse filing the file strokes are at right angles to the longer side of the work] ही पध्दत साधारणपणे जॉबच्या कडेवरील धातू काढण्यासाठी वापरतात. [This method is com-monly used to reduce material from the edges of work] ट्रान्सव्हर्स फाईलींगची पध्दत वापरुन जॉबची साईज ही फिनिशिंग साईजच्या जवळपास आणता येते व त्यानंतर जॉबवर लाँगीट्युडीनल फाईलींग करुन फायनल फिनिशिंग करतात.
ii) लाँगीट्युडीनल फाईलींग [Longitudinal filing]:-
3) प्रो फायलींग [ Pro-filing] :-
4) ड्रॉ फाईलींग [Draw filing] :-
फाईलींग करतांना पिनिंग टाळण्यासाठी कमी दाब देऊन फाईलींग करतात.
पिनिंग ऑफ फाइल [ Pinning of file] :- फाईलींग करतांना जॉबच्या निघणाऱ्या धातूच्या चिप्स फाईलच्या दात्यांमध्ये अडकतात. यालाच पिनिंग ऑफ फाइल म्हणतात. [During filing the metal chips (Filings) will clog between the teeth of the files this is known as pinning of the files] पिनिंग म्हणजेच क्लोगिंग ऑफ फाईल [Clogging of file] होय.
पिनिंग झालेल्या फाईलने फाईलींग करतांना जॉबच्या सरफेसवर स्क्रॅचेस येतात. तसेच फाईलींग व्यवस्थीत होत नाही. त्यामुळे फाइलींग करण्यापूर्वी पिनिंग काढणे आवश्यक असते.
पिनिंग काढण्याची पध्दत [ Method of removing pinning] :-
फाईलवर झालेले पिनिंग (क्लोगिंग) फाईल ब्रशने (फाईल कार्डने) काढतात. [Pinning of files is removed by using o file brush (file card)] पिनिंग काढतांना म्हणजेच फाईल क्लिनिंग करतांना फाईल ब्रश ओव्हरकट दात्यांच्या दिशेने चालविणे [Pull the file brush along the direction of the overcut] जे पिनिंग फाईल कार्डने सहन बाहेर येत नाहीत (निघत नाहीत) ते फाइलींगज् ब्रास अथवा कॉपर स्ट्रीपने काढावे. [Filings which do not come out easily by the file card should be taken out with brass or copper strip]
नविन फाईल क्लिनिंग करण्यासाठी केवळ ब्रास अथवा कॉपर या सॉफ्ट धातूंची स्ट्रीप वापरावी. कारण नविन फाइलसाठी जर स्टील फाईल कार्ड वापरले तर फाइलच्या शार्प कटिंग एजेस ताबडतोब खराब होतात.
[The Sharp cutting edges of the files will wear out quickly if a steel file card is used] जॉबवर स्मुथ फिनिशिंग आणतांना जादा पिनिंग होते कारण दात्यांचा पिच व खोली कमी असतात. फाईलच्या फेसवर खडूची पावडर (खडू) लावल्यास फाईलींग करतांना दात्यांमध्ये पिनिंग होण्याचे प्रमाण कमी केले जाते फाईलींग करतांना खडूच्या पावडरमध्ये अडकलेल्या चिप्स (फाईलींगज्) काढण्यासाठी फाईल वारंवार क्लिन (साफ) करावी.
काळजी :-
1) कामानुसार योग्य प्रकारची व क्रॅक हॅण्डल नसलेली फाईल वापरावी.
2) नविन फाईल प्रथम सॉफ्ट धातूवर वापरावी. कास्टींगवर नविन फाईल वापरु नये त्यासाठी जुनी फाइल वापरावी.
3) जॉब व फाईल यावर ग्रीस, ऑईल लागू देऊ नये.
4) फाईलींग करतांना जॉबच्या सरफेसवर हात फिरवू नये
5) पिनिंग टाळण्यासाठी फाइलच्या फेसवर कोरडा खडू लावणे स्मुध फाईलवर जादा दाब देऊन फाईलींग करु नये
6) जादा वेगाने फाईलींग करु नये.
हॅक्सॉ [Hacksaw]
हॅक्सों फ्रेम [Hacksaw frame] :- वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनचे मटेरीयल कट करण्यासाठी ब्लेडबरोबर हँड हॅक्सॉ वापरतात. हीचा उपयोग जॉबवर स्लॉट व वक्राकार भाग कट करण्यासाठीही होतो.
व्याख्या :- सॉईंग करतांना हॅक्सों ब्लेडला मजबूत व योग्य प्रकारे पकडून ठेवण्यासाठी जे होल्डींग टूल वापरतात. त्यास हॅक्सों फ्रेम म्हणतात.
भाग [Parts] :-
हॅक्सॉ फ्रेमचे पुढील पार्ट आहेत.
1) हॅण्डल याचा उपयोग हॅक्सों पकडण्यासाठी होतो हे पिस्तोल ग्रिप व स्ट्रेट टाईप या दोन प्रकारचे असू शकते.
2) फ्रेम :- ही फ्लॅट स्ट्रीप पासून किंवा पाईपची बनवतात.
3) अॅडजस्टेबल ब्लेड होल्डर [Adjustable blade holder] यालाच टेन्शन स्क्रू [tension screw] असेही म्हणतात. याच्या एका टोकावर विंग नट असतो दुसऱ्या टोकास पिन असते.
4) विंग नट [Kling nut] याला फ्लाय नट असेही म्हणतात, अॅडजेस्टेबल पिन होल्डरवर असतो.
5) पिन होल्डर हॅण्डलच्या जवळ असते यावरही पिन असते याला फिक्सड् पिन होल्डर असेही म्हणतात.
6) रिटेनिंग पिंन्स् [Retaining pins] यांनाच प्रॉग्ज् [Prongs] असेही म्हणतात. फ्रेममध्ये ब्लेड पकडतांना ब्लेडच्या पिनहोलमध्ये या पिन बसतात.
7) फ्रेम लेंथ अॅडजेस्टमेंट हा भाग अॅडजस्टेबल फ्रेमला असतो यामुळे फ्रेमची लांबी कमी जास्त करता येते.
1) सॉलीड फ्रेम
2) अॅडजेस्टेबल फ्रेम
1) सॉलीड फ्रेम [Solid frame ] :-
या फ्रेमची लांबी कमी-जास्त करता येत नाही या फ्रेममध्ये एकाच ठराविक स्टैंडर्ड लांबीचे ब्लेड बसवित येते. Solid Hacksaw Frame
2) अॅडजेस्टेबल फ्रेम - फ्लॅट टाईप :- या फ्रेमची लांबी कमी-जास्त करता येते-या फ्रेममध्ये वेगवेगळ्या स्टँडर्ड लांबीचे ब्लेड बसविता येते.
3) समायोज्य फ्रेम ट्यूबलर टाईप :- ही पाईपपासून बनवतात वेगवेगळ्या स्टेडर्ड लांबीचे ब्लेड बसवता येते. सामान्यपणे हीच फ्रेम जादा वापतात सॉईंग करतांना ही फ्रेम योग्य पकड देते तसेच नियंत्रणही व्यवस्थित ठेवता येते.
योग्य कामासाठी हॅक्सों फ्रेमची बांधणी मजबूत असणे आवश्यक असते. [For proper working it is neces-sary to have frames of rigid construction]
हॅक्सॉ ब्लेड | Hacksaw Blade] :-
वैशिष्ट्ये [Features] :- हॅक्सॉ ब्लेड हे स्टीलची पातळ
व अरुंद पट्टी असून त्याच्या एजवर दाते असतात. व दोन्ही टोकास पिन होल असतात. [A hacksaw blade is a thin narrow steel band with teeth, two pin holes at the end] हॅक्सॉ ब्लेड सॉईंगसाठी हॅक्सॉ फ्रेमबरोबर वापरतात.
हॅक्सों ब्लेड हे लो अलॉय स्टील [LA] किंवा हाय स्पीड स्टील [HS] या धातूंचे बनवितात. व त्यावर हार्डनिंग व टेम्परींग केलेले असते.
हॅक्सॉ ब्लेड 250 mm व 300 mm या स्टँडर्ड लांबीत मिळते.
हॅक्सॉ ब्लेडचे पुढील भाग असतात.
1) कटींग टिथ [Cutting teeth] ब्लेडच्या याच भागाने जॉबचा धातू कट होतो.
2) फेस [Face] :- ब्लेडच्या दात्यांच्या पुढील बाजूस फेस म्हणतात.
3) फ्लॅक [Flank] :- ब्लेडच्या मागील तिरकस बाजूस [Slant side] फ्लॅक म्हणतात.
4) क्रिस्ट :- एकाच दात्याची फ्लॅक व फेस जेंथे एकत्र येतात त्या पॉईटला क्रिस्ट म्हणतात.
5) रुट [Rout] :- एका दात्यांची फ्लॅक व शेजरच्या दुसऱ्या दात्यांचा फेस जेथे एकत्र येतात त्या भागास रुट म्हणतात. येथे रुटच्या ठिकाणी रेडियस दिलेला असतो.
6) पिन होल :- फेमच्या पिन्स या होलमध्ये अडकवितात.
-7) बैंक एज : ब्लेडच्या मागील बाजूच्या दाते विरहीत असलेल्या एजला बैंक एज म्हणतात.
8) साइड :- ब्लेडची दाते असलेली एज व बँक एज यातील सरफेसला साईड म्हणतात.
9) सेंटर लाईन : ब्लेडच्या रुंदीला मध्यातून लांबीच्या दिशेने जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे सेटर लाईन होय.
प्रकार [Types]: हॅक्सों ब्लेडचे दोन प्रकार आहेत. हे प्रकार कठिणपणावरुन पडलेले आहेत.
1) ऑल हार्ड ब्लेड
2) फ्लेक्झिबल ब्लेड
1) ऑल हार्ड ब्लेड [All hard blade] :-
या प्रकारचे ब्लेड पूर्ण लांबीत हार्डनिंग केलेले असते केवळ पिनहोलजवळचा भाग सॉफ्ट ठेवतात. [These blades are hardened to the full length between the pin hales]
2) फ्लेक्झिबल ब्लेड [Flexible blade]:- या प्रकारच्या
ब्लेडचे केवळ दात्यांना हार्डनिंग केलेले असते. इतर भाग सॉफ्ट ठेवलेला असतो त्यामुळे हे ब्लेड लवचिक [Flexible] असते. लवचिक असल्याने ते वाकले तरी तुटत नाही.
लवचिकपाणामुळेच फ्लेक्झिबल ब्लेड वक्राकार रेषेत सॉईंग करण्यासाठी उपयुक्त आहे [Flexible blades are useful for cutting along curved line because of their flexibility] शिकाऊ उमेदवारासाठीही वापरण्यास सोईस्कर आहे.
पिचनुसार वर्गीकरण [Classification according to pitch]:- दोन क्रमवर दात्यांच्या पॉईटमधील अंतरास पिच ऑफ ब्लेड म्हणतात. [The distance between adjacent or corrosponding teeth is known as pitch of blade]
पिचनुसार ब्लेडचे पुढील प्रकारात वर्गीकरण केलेले आहे.
सेटींग ऑफ द साँ [ Setting of the saw] :-
हॅक्सॉ ब्लेडचे काही दाते ब्लेडच्या डाव्या बाजूस काही दाते उजव्या बाजूस वळवलेले असतात व काही दाते सरळ ठेवतात.
दात्यांच्या या रचनेलाच सेटींग ऑफ द सॉ किंवा सॉ सेटींग म्हणतात.
सॉ सेटींगमुळेच सॉईंग करतांना तयार होणारा सॉ कट (कर्फ) ब्लेडच्या जाडीपेक्षा जादा रुंद बनतो व त्यामुळे ते धातूत प्रवेश करतांना कटमध्ये अडकत नाही व ब्लेडची सहज हालचाल होते.
सॉ सेटींगचे दोन प्रकार आहेत.
1) स्टॅगर्ड सेट
2) वेव्ह सेट
2) स्टॅगर्ड सेट | Staggered ste] :-
या प्रकारात एका आड एक असणारा दाता [dent] किंवा दात्यांचा संच स्टॅगर्ड केलेला असतो. [Alternate teeth or groups of teeth are staggered] या प्रकारच्या व्यवस्थेमुळे सॉईंग करतांना कापण्याची क्रिया मोकळी होते. व चांगला चिप क्लियरन्स मिळतो. [This arrangement helps for frce cutting and provides for good chip clearance] 1 mm पेक्षा जादा पिचचे ब्लेडवर हे सेटींग असते.
2) वेव्ह सेट [Wave set] :-
या प्रकारात ब्लेडचे दाते लहरीप्रमाणे (लाटेप्रमाणे) सेट केलेले असतात. [In wave set, the teeth of the blade are arranged in a wave form] याला झिगझेंग सेट [Zigzag set] असेही म्हणतात. फाईन पिच [0.8 mm) असलेल्या ब्लेडवर वेव्ह सेटींग केलेले असते.
ब्लेडच्या सॉ सेटींगचे पुढील प्रमाणे वर्गीकरण केलेले आहे.
सॉईंगकरतांना चांगल्या प्रकारचे काम मिळण्यासाठी योग्य पिच असलेल्या ब्लेडची निवड व ब्लेडची योग्य बांधणी या बाबी महत्वाच्या असतात. [ While sawing for the best re-sult the blade with the right pitch should be se-lected and fitted correctly]
ब्लेडची निवड | Selection of blade] :-
साईंग करण्यासाठी ब्लेडची निवड सॉईंग करावयाच्या जॉबचा आकार (क्रॉस सेक्शन) व कठिणपणा यावर अवलंबून असते. [The selection of the blade depends an the shape and hardness of the material to be cut] पुढील प्रमाणे योग्य पिचच्या ब्लेडची निवड करावी.
1) ब्रॉन्झ ब्रास, सॉफ्ट स्टील, कास्ट आयर्न, हेवी अँगलस् साठी 1.8 mm पिचचे [14 T.P.I] चे ब्लेड निवडावे सॉफ्ट मटेरीयलसाठी व जादा क्रॉस सेक्शनच्या जॉबसाठी 1.8 mm पिचचे ब्लेड वापरावे.
2) टूल स्टील, हाय कार्बन स्टील, हाय स्पीड स्टील साठी 1.4 mm पिचचे ब्लेड वापरावे.
अँगल आयर्न, ब्रास ट्युब, कॉपर, आयर्न पाईप यासाठी 1 mm पिचचे ब्लेड वापरावे.
3) कॉन्ड्युट पाईप [ Conduit pipe] व इतर पातळ ट्युब (कमी वॉल थिकनेसच्या ट्युब) शिट मेटल वर्क साठी 0.8 mm पिचचे (फाईन पिच) ब्लेड निवडावे.
सॉईंग करण्याची पध्दत [Method of Sawing] :-
1) साईंगसाठी जॉब क्रॉस सेक्शननुसार योग्य पध्दतीने बांधावा शक्यतो सॉ कट जॉबच्या कडेपेक्षा अथवा कॉर्नरपेक्षा फ्लॅट बाजूवर येईल याप्रमाणे जॉब व्हाईसमध्ये पकडावा त्यामुळे ब्लेड तुटण्याची शक्यता कमी होते.
2) सॉईंग करावयाचा भाग व्हाईसच्या शक्य तितक्या जवळ व कमी उंचीवर बांधणे त्यामुळे व्हायब्रेशन कमी होईल.
3) जॉबचा क्रॉस सेक्शन व कठिणपणा यानुसार ब्लेडची निवड करावी.
4) दात्यांचा तिरपेपणा फ्रेमच्या पुढील बाजूस म्हणजे कटच्या दिशेने राहील याप्रमाणे फ्रेममध्ये ब्लेड पकडणे [ The teeth of the hacksaw blade should point in the direc-tion of the cut and away from handle].
5) ब्लेड सरळ पकडावे व त्यावर योग्य ताण येईपर्यंत टाईट करावे फ्रेममध्ये ब्लेड लूज अथवा प्रमाणपेक्षा जादा ताण देऊन पकडू नये.
6) सॉईंग सुरु करण्यापूर्वी ब्लेडला मार्गदर्शन होण्यासाठी लहान नॉच मारावा.
7) हॅक्सों दोन्ही हाताने पकडणे. एका हातात हॅण्डल पकडून दुसरा हात पुढील बाजूस ठेवणे व नॉचवर हॅक्सा सरळ व एकसारखी मागेपुढे करणे.
8) ब्लेडची पूर्ण लांबी वापरली जाईल या पध्दतीने सॉईंग करणे तसेच स्ट्रोक पुढील बाजूस नेतांनाच दाब देणे [Apply pressuce only during the forward stroke]
9) एका वेळेस कमीत कमी दोन ते तीन दाते जॉबच्या संपर्कात राहतील याप्रमाणे सॉईंग करणे.
11) जुन्या सॉ कटमध्ये नवीन ब्लेड वापरु नये.
12) सॉ कट पूर्ण होत असतांना सॉईंगचा वेग व दाब कमी करावा त्यामुळे ब्लेड तुटणार नाही व आपल्यास दुखापत होणार नाही. [While finishing a cut slow down to avoid breakage of the blade and injury to your-self and others]. साधारणपणे हॅण्ड सॉईंग करतांना कुलंटची गरज नसते.
13) पाईपवर साईंग करतांना पाईप फिरवून त्याची स्थिती बदलवी व सॉईंग करावे.
ब्लेड तुटण्याची कराणे | Causes of breaking blade] :-
1) व्हाईसमध्ये जॉब लूज पकडला असल्यास
2) पातळ जॉबसाठी [ thin work] कोर्स पिचचे ब्लेड वापरल्याने , ब्लेड लूज पकडल्याने अथवा प्रमाणपेक्षा जादा ताण देऊन फिक्स केल्याने.
3) तिरपा गेलेला सॉ कट सरळ करण्याचा प्रयत्न केल्यास
4) हाताला झटके देऊन सॉईंग केल्याने.
5) जुन्या सॉ कटमध्ये नवीन ब्लेड वापरल्याने.
ब्लेड बोथट होण्याची कारणे:
1) फ्रेममध्ये ब्लेड उलटे पकडण्याने
2) जादा वेगाने सॉईंग केल्याने
3) हार्ड धातूसाठी कोर्स पिच ब्लेड वापरल्यास.
चिझल [Chisel] :-
व्याख्या:- जॉबवर चिपिंग व कटींग ऑफ ऑपरेशनसाठी जे हॅण्ड कटिंग टूल वापरतात त्यास कोल्ड चिझल म्हणतात. [The cold chisel is a hand cutting tool used by fitters for chipping and cutting off operations. चिपिग ही जॉबच्या पृष्ठभागावरील जादा असलेल्या धातू चिझल व हॅमरच्या मदतीने काढण्याची क्रिया आहे. [Chipping is an operation of removing excess metal with the help of a chisel and hammer] चिपिंग केलेला सरफेस खडबडीत [Rough] येत असल्यामुळे तो सरफेस फायलींग करुन फिनिशिंग केला जातो.
उपयोग [Uses] :-
1) जॉनच्या सरफेसवरील जादा असलेला धातू काढून टाकण्यास चिझल वापरतात.
2) रॉड, फ्लॅट, अँगल, शिट मेटल सारख्या जॉबचे तुकडे करण्यासाठी चिझल वापतात.
रचनात्मक वैशिष्ट्ये :-
चिझळ हाय कार्बन स्टील अथवा क्रोम व्हॅनेडियम स्टील [Chrome vanadium steel] पासून बनवतात. चिझलचा क्रॉस सेक्शन नेहमी षटकोनी किंवा अष्टकोनी असतो. चिझलच्या कटिंग एजवर हार्डनिंग व टेम्परींग केलेले असते.
चिझलचे पुढील पार्ट आहेत
1) हेड
2) बॉडी
3) कटिंग एज किंवा पॉईंट
चिझलचे हेड सॉफ्ट ठेवलेले असते. ते लवकर मशरूम होऊ नये यासाठी टेपर बनवलेले असते हेडवर हॅमरने आघात करतात.
चिझलला बॉडीपासून कटिंग एजपर्यंत टेपर असणारा भाग म्हणजे फोर्जिंग अँगल [Forging angle] होय याला ड्रॉईंग अँगल असेही म्हणतात. फोर्जिंग अँगल या भागामुळेच पुढील फायदे मिळतात.
1) चिझलच्या कटिंग एजला शार्पनींग सहज (कमी वेळेत) करता येते.
2) हॅमरचा आघात कटिंग एजपर्यंत एकत्रित रित्या पोहोचला जातो.
3) चिपिंग करतांना चिझलला क्लियरन्स मिळतो. कोल्ड चिझलचा फोर्जिंग अँगल साधारणपणे 30° त टेपर केलेला असतो.
प्रकार :-
कोल्ड चिझलचे पुढील प्रकार सर्वसाधारणपणे [Common] वापरतात.
1) फ्लॅट चिझल
2) क्रॉस कट चिझल
3) हाफ-राऊंड नोज चिझल
4) डायमंड पॉईंट चिझल
5) वेब चिझल (पंचींग चिझल)
1) फ्लॅट चिझल [ Flat chisel] :-
फ्लॅट चिझलच्या कटींग एजना (पॉईंटला) किंचीत बर्हिगोलाकार [ Slight Convaxity] देतात. त्यामुळे कटिंग एजची साईड (कॉर्नर) जॉबमध्ये खोलवर जात नाही व ती तुटत नाही [Slight convaxity is made on cutting edge to avoid digging in of the sides while chip-ping]
2) क्रॉस कट चिझल [Cross cut chisel] :-
या चिझलची कटिंग एज फोर्जिंग अँगलला क्रॉस असते या चिझलला केप चिझल [Cape chisel] किंवा डव्हटेल
चिझल [Dovetail chisel] म्हणतात. क्रॉस कट चिझलचा उपयोग कि वेज [Key ways] मुव्हज [grooves] व गाळे [Slot] तयार करण्यासाठी होतो. क्रॉस कट चिझलची कटिंग एज फोर्जिंग अँगलपेक्षा जादा रुंद असते. [ Cutting edge of cross cut chisel is wider than back portion] त्यामुळे या चिझलने गाळे,
कि वे तयार करतांना कटिंग एजच्या रुंदीइतका गाळा तयार होतो व त्यामध्ये मागील बाजू अडकता नाही. तीला क्लियरन्स मिळते व चिपिंग सहज करता येते.
3) हाफ - राऊंड नोज चिझल [Half round nose chisel] :-
ड्रिलींग करतांना आंऊट जाणारे ड्रिल होल सेंटरमध्ये आणण्यासाठीही या चिझलचा उपयोग करतात.
4) डायमंड पॉईंट चिझल | Diamond point chisel] :-
काढून ते शार्प बनविण्यासाठी होतो. [Diamond point chis-els are used for squaring material at the corner]
Diamond point chisel सरफेसवर व्ही आकारचे ग्रुव्ह पाडण्यासाठीही वापतात.
5) वेब चिझल [ Web chisel] :-
1) काऊमाऊथ चिझल [Cow mouth chisel] :-
2) साईड कट चिझल [Specification] :-
हीची कटिंग एज व फोर्जिंग अँगल बॉडीच्या एका बाजूस असतात. अडचणीच्या ठिकाणी वापरतात.
स्पेसिफिकेशन [Specification] :-
1) लांबी [Length of chisel]
2) कटिंग एजची रुंदी [Width of cutting edge]
3) प्रकार [Type]
4) क्रॉस सेक्शन ऑफ बॉडी
चिझलची लांबी 150 mm पासून 400 mm पर्यंत असते चिझलच्या कटिंगएजची रुंदी चिझलच्या प्रकारानुसार बदलते. [The width of cutting edge varies accoldng to the type of chisel]
चिझलचे कोन [ANGLES OF CHISEL]
1) पॉईंट अँगल [Point angle] :-
point angle of chisel is depends on the material to be chipped.
नरम [Soft] धातूंसाठी पॉईंट अँगल कमी ठेवतात तर हार्ड धातूंसाठी पॉईंट अॅगल जास्त ठेवतात [Sharp angles are given for soft matenals and wide angles for hard materials]
2) होल्डींग अँगल [Hoding angle] :-
पुढील चार्टमध्ये धातूनुसार चिझलचा पॉईंट अँगल व अँगल ऑफ इनक्लिनेशन दिला आहे.
कट करावयाचा धातू पॉईंट अँगल अँगल ऑफ इनक्लिनेशन
हाय कार्बन स्टील 65° 39.5°
कास्ट आयर्न 60 37°
माइल्ड स्टील 55° 34.5°
ब्रास 50° 32°
कॉपर 45° 29.50
अॅल्युमिनिअम 30° 22°
योग्य पॉईंट अँगल व अँगल ऑफ इनक्लिनेशन दिल्यास अचुक रेक अँगल व क्लियरन्स अँगल निर्माण होतात.
3) रेक अँगल [Rake angle] :-
चिपिंगसाठी चिझल जॉबवर पकडल्यानंतर जॉबच्या सरफेसला टाकलेला लंब [normal or perpendiculer line] व कटिंग एजची वरील बाजू यामध्ये होणाऱ्या कोनास रेक अँगल म्हणतात.
[Rake angle is the angle between the top face of the cutting point and normal to the work surface at the cutting edge] या अँगलमुळे चिप्स पुढील बाजूस वळतात.
4) क्लियरन्स अँगल [Clearance angle) :-
चिझलच्या कटिंग एजचा खालील सरफेस व जॉबचा सरफेस यातील कोन म्हणजे क्लियरन्स अँगल होय. [Clearance angle is the angle between the bottom face of the point and tangent of the work surface arginating at the cutting edge] जर क्लियरन्स अँगल खुप कमी अथवा झिरो असेल तर रेक अँगल वाढतो [if the clearance angle is too low or zero the rake angle increases] त्यामुळे कटिंग एज जॉबमध्ये प्रवेश करणार नाही ती सरफेसवरुन स्लिप होईल [The cutting edge cannot penetrate into the work the chisel will slip] जर क्लियरन्स अँगल प्रमाणपेक्षा जादा असेल तर रेक अँगल कमी होतो त्यामुळे चिझलची कटिंग एज आत घुसत जाते आणि कट हळूहळू वाढत जातो.
चिपिंग करण्याची पध्दत [Method of chipping]:-
1) चिपिंग करण्यापूर्वी हॅमर हेड हँडलवर मजबूत बसविले आहे याची खात्री करावी.
2) हॅमरला तसेच चिझलला तेलकट पदार्थ चिकलेले असल्यास ते पुसून घ्यावे [Wipe off oily substances if any from the hammer and chisel]
3) चिझलचे हेड मशरुम झालेले असेल तर ते टेपर ग्राईडींग करुन घ्यावे तसेच चिझलच्या कटिंग एजला चिपिंग करावयाच्या धातूनुसार योग्य कोनात शार्पनिंग करावे
4) डोळ्यांना सेफ्टी गॉगल लावणे.
5) हातातील घड्याळ [Wrist watches] व कडे [bangles] काढावे.
6) व्हाईससमोर चिपींग गार्ड (सेफ्टी गार्ड) ठेवावे [Install chip guard against chips flying off]
7) व्हाईसमध्ये जॉव मजबूत व योग्य पध्दतीने पकडणे जॉबला खालील बाजूने कठिण लाकडी ठोकण्याचा आधार द्यावा [Sup-port the wonk on a wooden block]
8) तरफेचा जादा फायदा मिळण्यासाठी हॅमरचे हॅण्डल टोकाजवळ पकडणे [Hold the hammer at the end of the handle for maximum leverage]
9) चिझलची बॉडी एका हाताने पकडून कटिंग एज जॉबच्या सरफेसवर सेट करणे चिझल योग्य इनक्लिनेशन अँगल देऊन पकडणे व हॅमरने हेडवर आघात करणे.
10) चिपिंग करतांना चिझलच्या कटिंग एजकडेच लक्ष ठेवणे
चिझलच्या हेडवर लक्ष ठेवू नये [While chipping look at the cutting aedge of the chisel, and not at the head of chisel]
11) धातूच्या एकसारख्या जाडीच्या चिप्स निघतील याप्रमाणे चिझल पकडून चिपिंग करावी.
12) व्हाईसच्या फिक्स जॉ च्या दिशेने चिपिंग करावी.
13) चिपींग करतांना जॉबच्या दुसऱ्या टोकास चिपींग करण्याचे असल्यास त्या टोकाजवळ चिपिंग जाण्यापूर्वी चिपिंग थांबवावे व समोरच्या टोकाकडून चिपिंग करावे. यामुळे जॉबची एज तुटणार नाही.
14) फार मोठ्या आकाराच्या चिप्स कट करु नये याप्रमाणे चिपिंगची पध्दत वापरावी.
मशरुम हेड [Mashroom head] :-
हेड म्हणतात. मशरुम हेड असलेली चिझल वापरल्यास चिपिंग करतांना या हेडचे तुकडे उडून अपघात होण्याची शक्यता असे तसेच चिझलच्या हेडवरुन हॅमरचा फेस स्लिप होऊ शकतो. हेड मशरुम झालेले असेल तर चिपिंग करण्यापूर्वी या हेडला ग्राईडींग करुन टेपर बनवावे.
चिझलला धार लावणे [Sharpening of chisel] :-
चिझल चिपिंगसाठी वापरल्याने तीची कटिंग एज बोथट होते त्यामुळे अशी चिझल कार्यक्षम चिपिंग होण्यासाठी पुन्हा शार्पनींग करणे आवश्यक असते.
चिझल्स ग्राईडींग मशिनवर शार्पनींग करतात.
बऱ्याचवेळेस चिझल रि-ग्राईडींग केल्यानंतर पुन्हा धार लावण्यास [For resharpening] अयोग्य असते अशा वेळेस चिझलच्या कटिंग एजला ग्राईंडींग करण्यापूर्वी फोर्जिंग करुन योग्य आकारात बनवावे.
[If chisels cutting edge become too thick it should be forged and brought to shape before grinding]
ग्राईडींग करतांना पुढील प्रमाणे पध्दत वापरणे.
1) ग्राईडींग मशिनचे व्हील गार्ड व्यवस्थित बसविलेले आहेत याची खात्री करावी.
2) ग्राईडींग व्हील तुटलेले अथवा क्रॅक नाही याची तपासणी करुन खात्री करावी.
3) डोळ्यांना सेफ्टी गॉगल लावा.
4) टूल रेस्ट (वर्क रेस्ट) व व्हीलचा फेस यामध्ये 2 mm गॅप आहे याची खात्री करा. नसल्यास ती सेट करा.
5) कुलंट कंटेनरमध्ये पुरेसे कुलंट आहे याची खात्री करा
6) ग्राईडींग मशिन चालु करतांना बाजूला उभे राहून चालू करा
व पूर्ण गती येईपर्यंत तेथेच उभे राहा.
7) ग्राईडींग करतांना चिझलच्या बॉडीला टूल रेस्टचा आधार देऊन पकडा व कटिंग एज फिरणाऱ्या व्हीलच्या फेसला स्पर्श करा.
8) चिझलची वक्राकार रेषेत हाताने डाव्या उजव्या बाजूस हालचाल करुन ग्राईडींग करा त्यामुळे कटिंग एजला बर्हिगोलाकार पणा निर्माण होईल. त्यामुळे चिपिंग करतांना तीच्या बाजू जॉबच्या सरफेसमध्ये खोलावर जाणार नाहीत. [Slight convaxity at the cutting edge of chisel help to avoid digging the sides while chipping]
9) चिझल फेसवर हलती ठेवा त्यामुळे कटिंग एजवर गाळा तसेच वक्राकारपणा येणार नाही.
10) ग्राईंडींग करतांना चिझल वारंवार कुलंटमध्ये बुडवा त्यामुळे ती गरम होणार नाही चिझल ओव्हर हिटींग झाल्यास तीचे टेंपरींग निघून जाते.
11) ग्राईंडींग व्हीलच्या केवळ फेसचाच उपयोग ग्राईंडींगसाठी करा. व्हीलच्या बाजूवर ग्राईडींग करु नये
[Use only the front of the grinding wheel do not grind on the sides]
[Do not use cotton waste or other material for holding the chisel while grinding]
13) काम झाल्यानंतर स्विच ऑफ करा. व्हील हाताने पकडून थांबविण्याचा प्रयत्न करु नये.
























































Comments