5 'S' संकल्पना (5 'S' Concept)


 5 'S' संकल्पना (5 'S' Concept)
5‘S' ही एक अशी व्यवस्था आहे कि ज्यामुळे योग्य काम करण्याची दिशा कायम ठेवली जाते. त्याच 
 1 बरोबर खर्चाच्या प्रमाणात कपात होते. याव्दारे उत्पादकता (productivity) वाढविली जाते. उत्पादनकार्यात खर्चाचे प्रमाण कमी करणे व गुणवत्तेत सुधारणा करणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे.
5'5' मधील 'S' हे जापानी भाषेतील पुढील पाच शब्दांचे पहिले अक्षर आहे.
(1) सीरी (Sciri)
(2) सिटोन (Sciton)
(3) सिसो (Sciso)
(4) सिकेट (Seiketsu)
(5) शिटसुके (Shitsuke)
या पाच जापानीज शब्दांना इंग्लिशमधून असलेले शब्द व त्याचा मराठीतून असलेला अर्थ पुढील प्रमाणे आहे.
(1) Sort - काम करण्याच्या ठिकाणी आवश्यक वस्तूंनाच ठेवणे. ज्या वस्तूंची आवश्यक नसेल किंवा ज्या वस्तूंची आवश्यकता कधीतरीच भासत असेल अशा वस्तूंना कामाच्या ठिकाणापासून योग्य प्रकारे दूर ठेवणे. यामुळे कामाचे क्षेत्र किंवा ठिकाण स्वच्छ ठेवण्यास मदत होते.
     तुटलेली किंवा खराब झालेली हत्यारे, अनावश्यक रॉ मटेरियल, स्क्रॅप, जुनी यंत्रे यांना कामाच्या ठिकाणा- पासून बाजूला ठेवल्याने बहूमुल्य जागेची बचत होते. याला रेड टॅगींग असेही म्हणतात.
(2) Set in Order-या क्रियेत प्रत्येक वस्तुला त्यांच्या उपयुक्त जागेवर ठेवण्याविषयीच्या पध्दतीशी निगडीत आहे. प्रत्येक वस्तुला योग्य प्रकारे तीच्या जागेवर ठेवल्या- मुळे त्यावर सहजपणे लेबलींग करता येऊ शकते. योग्य मांडणी केलेल्या वस्तुच्या किंवा भागाच्या सरफेसवर रंग देणे, त्यावर लेबल लावणे, कामाचे ठिकाण किंवा जागा यांची रूपरेषा तयार करणे यासारखी कामे 'सेट इन ऑर्डर' च्या अंतर्गत येतात.
     अर्थात 5 'S' च्या पहिली स्टेप असलेल्या 'Sort’ अंतर्गत अनावश्यक असलेल्या वस्तूंना कामाच्या ठिकाणा- पासून बाजूला किंवा वेगळे ठेवले तरच 'Setin Order' प्रभावी किंवा यशस्वी ठरते.
(3) Shine - कामाच ठिकाण आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्व मशिन्सच्या स्वच्छतेशी संबंधीत 'Shine ' या कार्याचा संबंध आहे.
     स्वच्छ वातावरणाच्या सानिध्यात काम केल्यामुळे मशिनमध्ये निर्माण झालेला कोणताही दोष संबंधीत कर्मचाया- च्या सहजपणे लक्षात येतो व तो सहजपणे या दोषाचे निवारण करू शकतो.
(4) Standardize - 5'S' मधील वरील तीन स्तंभांना लागू केल्यानंतर 'standardize' या स्तंभाच्या अंतर्गत केल्या जाणा-या कामांची सुरूवात होते. याच्या अंतर्गत कामाच्या ठिकाणी एका सर्वोत्तम प्रक्रियेचे प्रमाणी- करण केले जाते.
ज्या प्रक्रियेमध्ये वरील तीनही पध्दतीचा समावेश असेल त्याच प्रक्रियेचे प्रमाणीकरण केले जाते. 
'Standardize' या स्तंभामध्ये पुढील तीन कार्यांचा • समावेश केलेला आहे.
(i) 5 'S' (सॉर्ट, सेट इन आर्डर, शाइन) च्या कामांची जबाबदारी सोपविणे.
(ii) 5'S' पध्दतीला एका नियमित कार्याच्या रूपात
निश्चित करणे.
(iii) 5 ‘S’ ला कायम ठेवण्याकरीता नियमित तपासणी करणे.
(5) Sustain-सर्व पध्दतीना किंवा प्रक्रियांना अत्यंत चांगल्या प्रकारे कायम ठेवणे हा या 'S' चा उद्देश आहे. 5 'S' मधील हा सर्वात कठीण 'S' आहे..
वर्तमान काळात असणारी स्थिती तसेच आस्थापने- च्या कार्य-क्षेत्रात प्रमाणीकरणाचा अर्थ याच्याशी संबंधीत ही प्रक्रिया आहे.
या स्तंभाशिवाय वरील सर्व स्तंभाचे कार्य जास्त काळ टिकाव धरू शकत नाही.
5‘S’ प्रक्रियांच्या प्रमाणीकरणासाठी पुढील साधनांची आवश्यकता असते.
(a) जॉब सायकल चार्ट (Job Cycle Chart)
(b) दृश्य संकेत (Visual Symbol)
(c) वेळेचे बंधन (Time Restriction)
(d) चेक लिस्ट (Check List).

Comments

Popular posts from this blog

Lesson No. 06.1 Cutting Tools ( कटिंग टूल्स )

Lesson No. 01 Trade Instruction & Introduction

Lesson No. 02. Safety

Lesson No. 03 Workshop Safety

56/ 09. Identify various textile machines. (08) 10) Warping Machine.