व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टर

व्याख्या Difination :-

व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टर (युनिव्हर्सल बेव्हेल प्रोट्रॅक्टर) हे जॉबचे अँगल्स 5 मिनिटे [5] इतक्या
ॲक्युरसीत तपासण्या साठी वापरले जाणारे प्रिसिजन इन्स्ट्रूमेंट आहे.
भाग Parts :-
व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टरचे पुढील वेगवेगळे पार्टस् आहेत.
स्टॉक :-
अँगल तपासतांना स्टॉक हा बेव्हेल प्रोट्रॅक्टरचा संपर्कात येणारा एक सरफेस आहे प्रामुख्याने जॉबच्या ज्या सरफेसपासून उताराचा कोन मोजावयाचा आहे त्या सरफेसला स्टॉक संपर्कात ठेवला जातो.
डिस्क :-
डिस्क हा स्टॉकचा महत्वाचा पार्ट आहे डिस्क आकाराने गोलाकार असून तीच्या एजवर कोनांची आखणी केलेली असते.
डायल :-
डायल ही डिस्कला पिव्होटच्या मदतीने बसवलेली असते. व ती 360° त फिरविता येते. [ Dial is pivoted to the dise and can be rotated through 360°] डायललाच व्ह बे प्रोट्रॅक्टरची व्हर्नियर स्केल जोडलेली असते. [ The vernier scale of insrument is attached to the dial] मोजमापाचे वाचन करतांना डायल डिस्कवर लॉक करतात.
ब्लेड :-
ब्लेड हा व्ह. बे. प्रोट्रॅक्टरचा दुसरा स्पर्श करणारा भाग असून तो मोजमाप घेतांना जॉबच्या तिरकस पृष्ठठभागाच्या संपर्कात येतो. [ Blade is the other contacting surface of the instrument that con- tact the work during measurement, preferably the inclined surface]
ब्लेड डायलला क्लॅम्पींग लिव्हरच्या मदतीने फिक्स करतातत. ब्लेडला मध्यभागी आयताकृती गाळा पाडलेला असतो. त्यामुळे ब्लेड डायलवर लांबीच्या दिशेने सरकवून आवश्यकतेनुसार सेट करुन लॉक करता येते.
लॉकींग स्क्रू [ Locking screw] :-
व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टरला दोन लॉकींग स्क्रू असतात. त्यापैकी एक लॉकींग स्क्रू डायलला डिस्कवर लॉक करतो तर दुसरा ब्लेडला डायलवर लॉक करतो.
फाईन ॲडजस्टमेंट मॅकेनिझम [ fine adjustrment mechanism] :-
कोनाचे ॲक्युरेट माप सेट करण्यासाठी फाईन ॲडजस्टमेंट मॅकेनिझम वापरतात.
ॲक्युट अँगल ॲटॅचमेंट | Acute angle attach- ment] :-
ज्या ठिकाणी कोन तपासतांना जॉबवर व्ह बेव्हेल प्रोट्रॅक्टर जॉबवर सेट करणे अडचणीचे असते तेथे या ॲटॅचमेंटचा उपयोग करतात. तसेच लघुकोन तपासतांना वापरतात.
मॅग्नीफाईंग ग्लास :-
वाचन करतांना आखणी स्पष्ट दिसावी यासाठी ही ग्लास बसवलेली असते. [A magnifying glass is sometimes fitted for clear reading of the graduations] व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टरचे सर्व पार्टस् उच्च प्रतिच्या अलॉय स्टीलपासून बनवलेले असतात व योग्य प्रकारे उष्णतोपचार करुन अचुक फिनिशिंग केलेले असतात.



तत्व [ Principle] :-
एकमेकांवर फिरणाऱ्या दोन 'तबकड्यांच्या अखणीतील फरकावर लिस्टकाऊट आधारीत आहे.
लिस्ट काऊंट = मेन स्केल - व्ह. स्केल
उपयोग | Use] :-
व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टरचा उपयोग लघुकोन [90° पेक्षा कमी] मोजण्यासाठी करतात.
The vernier bevel protractor is used to measure acute angles i.e. less than 90°] विशालकोन ( 90° पेक्षा मोठे) कोन मोजण्यासाठी. मशिन टूल्स, वर्क टेबल यावर वर्क होल्डींग डिव्हायसेस कोनात सेट करण्यासाठी.
वरील सर्व उपयोग व्ह. बेव्हेल प्रोट्रॅक्टरने 5'
इतक्या अचुकतेने करता येतात.
व्हर्नियर बेव्हेल प्रॉट्रॅक्टरवरील आखणी
कोनाकृती माप घेण्याच्या उद्देशाने डिस्कच्या परिघावर कोनांची आखणी करतात. 360° ची आखणी करतात. या 360° चे चार भागात विभागणी करतात. ते म्हणजे 0° - 90°, 90°-0°0°-90° व 90° ते 0° याप्रमाणे, प्रत्येक 10 च्या अंशांची रेषा लांब आखतात व त्यावर संबंधीत अंशाचा नंबर कोरलेला असतो. 360° चे याप्रमाणे 360 सारखे भाग करतात. त्यातील एका भागाची किंमत 1° (one degree) असते. डिस्कवरील या आखणीला मेन स्केल डिव्हीजन म्हणतात. [ The graduations on the disc are known as the main scale divisions]
डायलवर मेन स्केलवरीलज 23° इतके अंतर घेऊन त्याचे समान 12 भाग करतात. प्रत्येक 3 री रेषा लांब काढून त्या रेषेवर अनुक्रमे 0, 15,30,45, व 60 हे नंबर कोरलेले असतात. डायलवरील या आखणीस व्हर्नियर स्केल म्हणतात. डायलवर ही व्हर्नियर स्केलची आखणी शुन्याच्या डाव्या व उजव्या या दोन्ही बाजूस केलेली असते.
व्हर्नियर स्केलवरील 12 भागांची एकूण किंमत 23° असते. म्हणून,

                                       12 भागांची एकूण किंमत
एक व्ह. डिव्हीजनची किंमत =--------------------
                                       व्ह. स्केलवरील एकूण भाग


                                         23°
                                      =------
                                         12


                                           11°
                                      = 1----
                                           12

                                      = 1°,55' म्हणजेच 115'

लिस्ट काऊंट
मेन स्केलवरील एक भागाची किंमत 1° असते व व्हर्नियर स्केलवरील एकाची भागाची किंमत [ The & value of one vernier division] 23°÷12 असते.
ज्यावेळेस व्हर्नियर स्केलचा झिरो मेन स्केलवरील झिरोला कोनासाईड करतात. त्यावेळेस व्हर्नियर स्केलची पहिली डिव्हीजन मेन स्केलवरील दुसऱ्या डिव्हीजनच्या अंत्यत जवळ असते. याचाच अर्थ व्हर्नियर स्केलच्या एका भागाची किंमत मेन स्केलवरील जवळ जवळ 2° इतकी असते. म्हणून,
लिस्टकाऊंट मेन = स्केल - व्हर्नियर स्केल
                       = 2 MSD -1 VSD

                         2°-23
                 LC = ------
                         12

           छेदाचा लसा. वी 12

                           24° - 23°
                  LC = ------------
                           12

                           1°
                  LC =----- [ 1° = 60 मिनिटे म्हणून ]
                           12


                  LC = 5' (पाच मिनिटे)
व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टरचा लिस्टकाऊंट /
ॲक्युरसी 5' आहे.
ब्लेड व स्टॉक यांच्या कोणत्याही सेटींग मध्ये लघुकोन व त्याला पुरक असलेला विशालकोन या दोन्ही कोनाचे वाचन करता येते. व हे डायलवरील व्हर्नियर स्केलच्या दुहेरी आखणीमुळे शक्य होते. व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टरचे वाचन
1) प्रथम व्हर्नियर स्केलच्या शुन्याचे ओलांडलेले मेन स्केलवरील पूर्ण अंश वाचावे म्हणजेच मेन स्केलचा झिरो व व्ह. स्केलचा झिरो यातील पूर्ण अंश प्रथम वाचावे.
2) नंतर व्हर्नियर स्केलची जी रेषा मेन स्केलवरील एखाद्या रेषेला तंतोतंत कोनासाईड झाली असेल तीच्या क्रमांकास लिस्टकाऊंटने (5 मिनिटे) गुणावे गुणाकार पहिल्या रिडींगपुढे मिनिटात लिहीणे दोन्ही रिडींग एकत्र वाचणे.
वाचन घेताना मेन स्केलचे वाचन ज्या दिशेने घेतले असेल त्याच दिशेने व्हर्नियर स्केलचे वाचन घ्यावे.
जर मेन स्केलचे वाचन झिरोपासुन घड्याळाच्या
काट्याच्या विरुध्द दिशेने घेतले तर व्ह. स्केलचे वाचनही
घड्याळाच्या काट्याच्या विरुध्द दिशेनेच घ्यावे.
जर मेन स्केलचे वाचन झिरोपासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने घेतले असेल तर व्हर्नियर स्केलचे वाचनही घड्याळाच्या काटयाच्या दिशेनेच घ्यावे.
उदा. व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टरमध्ये दाखविलेले पुढील लघुकोनाचे वाचन दाखवा.



विशाल कोनाचे वाचन 
     विशाल कोनाचे वाचन मिळविण्यासाठी वरील प्रमाणेच प्रथम व्ह. बे प्रॉट्रक्टरने दाखविलेला लघुकोन वाचने आलेले रिडींग 180° तून वजा केल्यास ऑबट्युज अँगल मिळेल.
विशाल कोन (obtuse angle) = 180° लघुकोन - (acute angle) उदा. जॉबचा विशालकोन तपासतांना व्ह. बे. प्रोट्रॅक्टरचे रिडींग 22°, - 30' आहे. तर त्याचा पुरक विशाल कोन किती असेल.
obtuse angle = 180°- reading (Acute angle)

                        = 180° -22°, 30'

                        = 157°, 30'

महत्वाचे मुद्दे :-
     व्हर्नियर बेव्हेल प्रोट्रॅक्टरचे सेटींग मोजावयाच्या कोनाच्या प्रकारावर अवलंबून असते.
     मोजमाप घेण्यापूर्वी मेझरींग सरफेस (ब्लेड व स्टॉक) सॉफ्ट कापडाने पुसावे. जॉबची बर काढावी व तो स्वच्छ पुसावा.
     व्हर्नियर स्केल लॉकींग स्क्रू लूज करावा. ब्लेड लॉकींग स्क्रू लुज करावा. ब्लेड जॉबवर सेट करता येईल याप्रमों ॲडजेस्ट करणे. व लॉक स्क्रू टाईट करुन प्रोट्रॅक्टर जॉबवर ठेवणे.
     प्रोट्रॅक्टर अशा प्रकारे सेट करणे कि ब्लेडची आतील कडा जॉबच्या सरफेसला संपर्कात येईल. जॉबच्या मोजावयाच्या सरफेसला प्रोट्रॅक्टर लंबरुप ठेवावे ब्लेड, बेस व जॉबचे सरफेस यात गॅप नाही याची खात्री करणे.
     काम झाल्यावर स्वच्छ करुन बॉक्समध्ये ठेवणे.

Comments

Popular posts from this blog

Lesson No. 06.1 Cutting Tools ( कटिंग टूल्स )

Lesson No. 01 Trade Instruction & Introduction

Lesson No. 02. Safety

Lesson No. 03 Workshop Safety

56/ 09. Identify various textile machines. (08) 10) Warping Machine.