Lathe Machine

      Lathe Machine    

लेथ - ज्या मशिन टूलवर दंडगोलाकृती, शंक्वाकृती, गोलाकार वस्तु तयार करता येतात त्यास लेथ असे म्हणतात. त्याचप्रमाणे यावर आटे (थ्रेडींग) ड्रीलींग, रीमींग टॅपींग इत्यादी क्रिया करता येतात.

लेथ हे एक बहुउद्देशीय यंत्र आहे. (मल्टीपरपज) कसबी कलाकार यावर कोणत्याही प्रकारचे अचुक काम करू शकतो.

लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्त्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन् ज्याने काम करायचे आहे त्याला टूल' म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात.

प्रकार - लेथमध्ये सुधारणेवरून व कामाच्या पद्धतीवरून खालील प्रकार पडतात.

1) हँड लेथ - 

     हा लेथ सुतार कामामध्ये त्याचप्रमाणे मऊ धातूसाठी वापरतात. यामध्ये बेडवर डाव्या बाजूला हेड स्टॉक असतो व स्पिंडलमध्ये लाईव्ह सेंटर असतो व ऊजव्या बाजूला टेलस्टॉक असतो. त्यामध्ये डेड सेंटर असतो. दोन्ही सेंटरमध्ये जाब पकडून त्याला विद्युत मोटारीच्या सहाय्याने गती दिली जाते व टूलरेस्टवर हत्याऱ्याना आधार देवून हातामध्ये हत्यारे धरून जॉबला हवा तो आधार दिला जातो. हत्यारांची हालचाल हातानीच करावी लागते म्हणूनच याला हँड लेथ असे म्हणतात.

2) बेंच लेथ - 

     हा लेथ सेंटर लेथप्रमाणे असतो पण आकारानी लहान असतो व तो जाड फळींच्या बाकावर बसविलेला असतो म्हणून याला बेंच लेथ म्हणतात. याला बेड, हेड स्टॉक, टेलस्टॉक व कॅरेज हे प्रमुख भाग असतात. याचा उपयोग छोट्या छोट्या कामासाठी उदा. विद्युत यंत्रामधील भाग, घड्याळाचे भाग इत्यादीसाठी करतात.

3) इंजिन लेथ - 

     यालाच सेंटर लेथ असे म्हणतात. याचा उपयोग मध्यम व मोठ्या कामासाठी होतो. यामध्ये हेड स्टॉक, टेलस्टॉक, कॅरेज, बेड असे प्रमख भाग असतात. सर्वसाधारण लहान मोठ्या वर्कशॉपमध्ये याचा वापर होतो.

4) टरेट आणि कॅप्स्टन लेथ :-

     हे लेथ सेंटर लेथ सारखेच असतात. परन्तु यामध्ये कामगाराच्या उजव्या बाजूला बेडवर टेल स्टॉक ऐजवी टरेट हेड किंवा कॅप्स्टन हेड हा भाग असतो. या भागावर षटकोनी टरेट हेड असते. त्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी सहापेक्षा जास्त टुलांची मांडणी करता येते. त्यामुळे टूलांची अदलाबदल करण्याच्या वेळेमध्ये बचत होते व एकसारखे जॉबचे भरपूर प्रमाणांत उत्पादन करता येते. म्हणून या लेथचा वापर भरपूर उत्पादनाच्या ठिकाणी होतो.

टरेट लेथ आणि कॅप्स्टन लेथ मधील फरक.

टरेट लेथ :-

1) मध्यम व मोठ्या कामासाठी वापर. 

2) टरेट हेड त्याच लेथबेडवर असते.

3) टरेट हेड हाताने इडेक्सींग करावे लागते.

कॅप्स्टन लेथ :-

1) छोट्या व मध्यम कामासाठी वापर.

2) टरेट हेड हे स्वतंत्र स्लाईडवर असते.

3) टरेट हेड आपोआप पाठीमागे गेल्यावर इंडेक्सींग होते.

साम्य-

1) दोन्ही लेथ भरपूर उत्पादनाच्या ठिकाणी वापरतात.

2) दोन्हींवर ही षटकोनी टरेट हेड असते. 

3) दोन्हीवर प्रथम सेटींग करून घ्यावे लागते व त्यासाठी अनुभवी कामगार हवा असतो.

5) स्पेशल लेथ :-

ठराविक प्रकारची क्रिया भरपूर प्रमाणात करावयाची असेल तर त्यासाठी सेंटर लेबमध्ये खास व्यवस्था केली जाते. त्यामुळे उत्पादन व अचुकता साध्य होते व लेथमध्ये अनावश्यक भागांची रचना केलेली नसते उदा. फेसिंग लेथमध्ये बेडची लांबी कमी असते, टेलस्टॉक नसतो त्याचप्रमाणे थ्रेडींगची सोय नसते. फक्त याच्यामध्ये स्विंग फिरणाऱ्या बचा व्यास जास्त जास्त असतो. त्याचप्रमाणे, क्रॅक टर्निंग लेख, कैम टर्निंग लेथ, ब्रेडींग लेथ, कॉपी टर्निंग लेथ इत्यादी प्रकारचे खास लेथ असतात.

6) ॲटोमॅटीक लेख - 

     या लेथमध्ये प्रत्येक क्रियेसाठी स्वतंत्र स्लाईड असते व ती स्लाईड कॅमचे सहाय्याने चालविली जाते. त्यामुळे स्लाईड मागे पूढे आपोआप होते. म्हणजेच याच्यामध्ये सर्व क्रिया या स्वयंचलीत ॲटोमॅटीक होतात. एकदा लांब सळई मशिनमध्ये पकडल्यास चक ढिला होने, जॉब पूढे सरकणे, पूर्ण झाल्यानंतर कटींग होणे या सर्व क्रिया आपोआप होतात. फक्त याच्यामध्ये आगोदर सर्व प्रकारचे सेटींग करून घ्यावे लागते त्यासाठी कुशल कारागिराची गरज भासते व नंतर अर्धकुशल कारागिर काम करू शकतो. एक कामगार दोन तिन लेथवर काम करू शकतो. मापामध्ये फरक पडल्यास परत तेवढ्याच मापाच्या स्लाईडमध्ये ॲडजेस्टमेंट दुरुस्ती केली जाते.

7) एन. सी. आणि सी.एन.सी. लेथ - 

     अलीकडे भरपूर उत्पादन व अचुकता मिळण्यासाठी या प्रकारच्या लेथचा वापर होऊ लागलेला आहे. यामध्ये सुद्धा सर्व क्रिया स्वयंचलीत लेथ प्रमाणेच होतात. पण त्यासाठी वेगळ्या स्लाइडसाठी व हालचालीसाठी ए.सी. किंवा डी.सी. करंटची मोटार जोडलेली असते व हालचालीवर नियंत्रन ठेवण्यासाठी कॉम्प्युटर बसविलेला असतो. त्यामुळे प्रत्येक कटींग टुलाची हालचाल आपोआप व मर्यादीत होते. या यंत्राच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारची चूक होत नाही? कारण चुक निर्माण झाली तर ते यंत्र बंद पडते व परत चुक दुरूस्त केल्याशिवाय चालूच होत नाही. या यंत्राकडून पूर्वीपेक्षा कितीतरी पटिने जास्त व अचुक काम होऊ लागलेले आहे. फक्त सुरवातीचा खर्च तेव्हढाच जास्त आहे. म्हणून अलीकडे सर्वच मोठमोठ्या कारखान्यामध्ये एन. सी. आणि सी. एन. सी. मशिनचाच वापर होऊ लागलेला आहे. त्यामुळे कारखान्यातील कामगारांची संख्या कमी होऊ लागलेली आहे.

     एन. सी. (N.C.)         = न्यूमेरीकल कंट्रोल व

     सी.एन. सी. (C.N.C.) = कॉम्प्युटराईजड न्यूमेरीकल कंट्रोल

     या प्रकारमध्ये सर्व प्रकारच्या मशिन टुल्स असतात, लेथ, ड्रीलींग, मिलींग, बोरींग इत्यादी.

Comments

Popular posts from this blog

Lesson No. 06.1 Cutting Tools ( कटिंग टूल्स )

Lesson No. 01 Trade Instruction & Introduction

Lesson No. 02. Safety

Lesson No. 03 Workshop Safety

56/ 09. Identify various textile machines. (08) 10) Warping Machine.