Carpentry

 Carpentry hand tools सुतारकाम विभागातील साधने

Measuring tools मोजमाप घेण्याची साधने:- 

      सुतारकाम करताना मापे घ्यावी लागतात. त्या करिता खालील साधनांचा चा उपयोग करतात. 

1) स्टील टेप:-

Diagram No. 1

Diagram No. 2

Diagram No. 3

Diagram No. 4

      सुतार कामामध्ये या साधनांचा नेहमी संबंध येतो. लाकडाची लांबी, रुंदी, जाडी मोजण्यासाठी तसेच मापे घेण्यासाठी याचा उपयोग होतो. हा बाजारामध्ये ३.मी. ५ मी. मध्ये उपलब्ध असतो. या टेप मध्ये स्टील रील (पातळ पट्टी) असते. त्यावरती इंच व सेंटीमीटर च्या खुणा असतात हा टेप सहज हाताळता येतो.

2) स्टील रुल :-

Diagram No. 1


Diagram No. 2


      पोलादी मोजपट्टी हे रेखीय मापनासाठी वापरण्यात येणारे प्रमाणित साधन होय. याद्वारे प्रत्यक्ष पद्धतीने मापन करता येते. या पट्टीच्या एका बाजूवर वरच्या व खालच्या कडेला इंच व मिलीमिटरच्या तसेच से. मी. च्या खुणा केलेल्या असतात. हीची साईज ५० मिलीमिटर ते १ मीटर लांबीपर्यंत उपलब्ध असते.

3) गुण्या:-

Diagram No. 1


      गुण्या पोलादापासून बनवलेला असतो. त्याचे दोन भाग असतात. (१) स्टॉक व (२) ब्लेड हे होय. पात्या वर इंच चे किंवा सेन्टीमीटरचे मापे असतात. पाते व खोड हे (90°) काटकोनात रिव्हेटींग करून जोडलेले असते.

Work holding devices (पकडणारी हत्यारे व इतर साधने) :-

उद्धिष्टे :-

      सुतारकामात पकड काम करण्यासाठी खालील साहित्य वापरतात. 

1) Carpentry Work Bench-सुतारकामाचे टेबल (वर्किंग बेंच) :-

Diagram No. 1


Diagram No. 2


      सुतार काम करण्याकरिता व त्यावरती सूत्री शेगडा फिट करण्याकरिता सुतार कमचे टेबल असावे लागते. हे काम टेबलवरती करत असल्यामुळे ते मजबूत असते व ते लाकडापासून बनविले असते. त्याचा टेबलावरील top २ इंच जाडीचा लाकडी फळीचा असतो. टेबल ४ ते ५ फुट लांब २.५ ते ३ फुट रुंद असतो. उंची ३ फुट पर्यंत असते पायाची जाडी २६ ते ३ इंच पर्यंत असते.

      या टेबल चा उपयोग लाकडावर काम करावयाचे आहे ते लाकूड वर्किंग बेंच वर ठेऊन मोजमाप घेणे त्या लाकडावर आखणी करणे असाही होतो. याटेबलच्या एका बाजूस सुतारी शेगडा बसविलेला असतो.

2) Carpentry Bench vice (सुतारी शेगडा) :-

Diagram No. 1


Diagram No. 2


      सुतार काम करताना जॉब किंवा लाकूड फिट करण्यासाठी त्याच्यावर क्रिया करण्यासाठी याचा उपयोग करतात. हा शेगडा फक्त सुतार कामात वापरण्यास योग्य असल्यामुळे यास सुतारी शेगडा असेही म्हणतात. हा शेगडा बीड (CastIron) पासून तयार करतात.

Care & Maintenance (निगा व काळजी) :-

1) सुतारी शेगडा हाताळताना त्याच्यावर हातोडीचा वापर करू नये. 

2) काम झाल्यानंतर शेगड्यातील भुसा साफ करावे.

3) जी भीड (G Cramp):-

Diagram No. 1


Diagram No. 2


      तासकाम करून लाकडाची जाडी कमी करताना किंवा लाकडांना चौकोनी छिद्र पडताना लाकूड पक्के पकडून ठेवावे लागते. त्यासाठी जी भीड या साधनांचा उपयोग करतात. भीडचा आकार इंग्रजी G अक्षरासारखा असतो. भीड पोलादापासून बनविलेला असतो.

4) भीड (Cramp):-

Diagram No. 1


Diagram No. 2


      आकृतीत दाखविल्याप्रमाणे हे हत्यार लोखंडी असून इंग्रजी 'T' च्या छेदाचा एक लांब दांडा असून त्यावर दोन जबडे असतात. एक जबडा दांड्याच्या एका टोकास कायम बसविलेला असतो. व दुसरा जबड़ा सरकता असतो. भिदाचे सर्व भाग पोलादाचे असतात. सुतार कामात फर्निचर, दारे व खिडक्यांच्या चौकटी व झडपा जोडण्यासाठी भीड़ वापरतात. लहान भिड्यांना syash cramp म्हणतात,

5) अंबुर (Pincer) :-

Diagram No. 1


Diagram No. 2


      ओती व पोलादाचे तयार केले असतात. त्याच्याएका बाजूला गोलाकृती व दुसऱ्या बाजूस शिंगाकृती आकार असतो. याचा उपयोग खिळे काढण्यासाठी करतात. सुतार कामात साधारणता ८ इंच अंबुर (Pincer) वापरतात.

Care & Maintenance (निगा व काळजी) :-

      1) तुमचे चिमटे फक्त तारा किंवा खिळ्यांच्या आकारावर वापरून त्यांना चांगल्या स्थितीत ठेवा. जर तुम्ही ते जाड वस्तूंवर वापरण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही कटिंग कडा खराब करू शकता.

      2) चिमटा हातोडा म्हणून न वापरण्याचा इशारा पिंसर हातोडा म्हणून वापरण्याचा मोह करू नका जोपर्यंत त्यांच्याकडे विशेष सपाट जबडा वैशिष्ट्य नसतो. तुम्ही चिमटा खराब करू शकता किंवा नखे ​​चुकवू शकता आणि तुमचा हात मारू शकता.

      3) साधने साफ करणे आणि साठवणे वापरल्यानंतर चिमटा स्वच्छ केल्याची खात्री करा. कापडाने किंवा ताठ ब्रशने स्वच्छ करा आणि कटिंगच्या काठावरील कोणतीही वंगण साबणाने पाण्याने धुवा. गंज तयार होण्यापासून रोखण्यासाठी पूर्णपणे कोरडे करा.

       4) थ्री-इन-वन तेलाचा कॅन पिंसर्सचे जबडे आणि बिजागरांना हलक्या तेलाच्या थेंबाने वंगण घालण्याआधी ते जास्त काळ टिकून राहण्यास आणि गंज टाळण्यास मदत होईल.

       5) कंपार्टमेंटसह टूल बॉक्समध्ये पिन्सर साठवले जातात पिंसर साठवा जेणेकरून त्यांच्या कटिंग कडा इतर साधनांच्या संपर्कात येणार नाहीत. 

       6) कंपार्टमेंटलाइज्ड टूल केस योग्य असेल किंवा तुम्ही त्यांना भिंतीवर टांगू शकता.

       7) तपकिरी लेदर टूल रोलमधील साधने टूल रोल हे एक चांगले स्टोरेज ठिकाण आहे.वेगळे पॉकेट्स पिंसर्सना इतर साधनांमध्ये आदळण्यापासून थांबवतात आणि त्यांच्या कटिंग कडांना नुकसान होण्यापासून वाचवतात. जाड लेदर सर्वोत्तम संरक्षण देतात.

Comments

Popular posts from this blog

Lesson No. 06.1 Cutting Tools ( कटिंग टूल्स )

Lesson No. 01 Trade Instruction & Introduction

Lesson No. 02. Safety

Lesson No. 03 Workshop Safety

56/ 09. Identify various textile machines. (08) 10) Warping Machine.