Lesson No. 06.1 Cutting Tools ( कटिंग टूल्स )
6.१. कटिंग टूल्स ( Cutting Tools ) - कापण्याची साधने फाइल :- धातू कापण्याच्या पध्दती [ Methods of meterial cutting] :- धातू कट करण्याच्या तीन पध्दती आहेत. 1] खरडणे [ abrasion] 2] वितळवणे [ Fusion] 3] कापणे [Incision] फाइल व फाइलींग :- फाइल हे कटिंग टूल असून फाइलचा उपयोग पृष्ठभागा वरील जादा धातू काढणे, जॉब योग्य साईजमध्ये आणणे व त्याला फिनिशिंगमध्ये बनविणे, जॉबची बर काढणे यासारख्या कामासाठी होतो. फाइलींग ही फाइलच्या मदतीने जॉबच्या सरफेसवरील जादा असलेले मटेरीयल काढण्यासाठी क्रिया आहे. [Filing is method for removing excess material from workpiece by using a file which acts as cutting tool] फाईलचे भाग [ ELEMENTS OF FILE ] :- फाईलचे पुढील वेगवेगळे पार्ट आहेत. 1) पॉईंट [Point] किंवा टीप [Tip] :- टॅगच्या विरुध्द बाजूस (टोकास) असणाऱ्या भागास टीप किंवा पॉईंट म्हणतात. फाइलींगला सुरुवात करण्यापूर्वी जॉबच्या सरफेसवरील बल्क मटेरिलय (Bulk material) किंवा हार्ड स्किन (Hard skin) याने काढतात. फाइलींग करतांना पॉईंटवर एका हाताने दाब देतात. 2) फेस [Face] किंव...
Comments