Lesson No. 118, 119, 120.
Lesson No. 118. Orientation To Textile Sector.
Lesson No. 119. Overview of Textile Industry.
Lesson No. 120. History.
१. Definition (व्याख्या) :-
Orientation (ओळख): कापड उद्योग क्षेत्र (Textile Sector) म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित तंतूंपासून (Fibers) सूत तयार करणे आणि त्या सुतापासून कापड विणून त्याचे मानवी वापरासाठी रूपांतर करण्याची प्रक्रिया.
Textile Industry (कापड उद्योग): हा एक असा उद्योग आहे जो धागा निर्मिती (Spinning), कापड विणकाम (Weaving/Knitting), प्रक्रिया (Processing) आणि वस्त्र निर्मिती (Garmenting) या चार मुख्य टप्प्यांवर आधारित आहे.
२. Objectives (उद्दिष्टे) :-
1. भारतीय अर्थव्यवस्थेतील कापड उद्योगाचे महत्त्व समजून घेणे.
2. कापड उद्योगाची रचना (Structure) आणि त्यातील विविध विभागांची माहिती मिळवणे.
3. विणकामाचा प्राचीन इतिहास आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे झालेली वाटचाल अभ्यासणे.
4. या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची ओळख करून घेणे.
३. Overview & Types (उद्योगाची रचना आणि प्रकार) :-
कापड उद्योगाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात:
१. संघटित क्षेत्र (Organized Sector)
हे क्षेत्र प्रामुख्याने मोठ्या यंत्रसामग्रीवर आणि सरकारी नियमावलीवर आधारित असते.
स्वरूप: यामध्ये मोठ्या स्पिनिंग (Spinning) आणि कंपोझिट मिल्सचा (Composite Mills) समावेश होतो. जिथे कच्च्या कापसापासून थेट कापड तयार होईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया एकाच छताखाली चालतात.
नोंदणी: या कंपन्यांची सरकारकडे अधिकृत नोंदणी असते आणि त्या 'फॅक्टरी ॲक्ट' (Factory Act) अंतर्गत येतात.
कामगार: येथील कामगारांना ठराविक वेतन, कामाचे निश्चित तास, भविष्य निर्वाह निधी (PF), विमा आणि रजेच्या सोयी मिळतात.
उत्पादन: येथे उत्पादनाचे प्रमाण खूप मोठे असते आणि प्रामुख्याने निर्यातीसाठी (Export) किंवा मोठ्या ब्रँड्ससाठी काम केले जाते.
२. असंघटित क्षेत्र (Unorganized Sector)
भारतातील कापड उद्योगाचा मोठा हिस्सा या क्षेत्रात येतो. हे क्षेत्र विखुरलेले आणि स्थानिक पातळीवर चालणारे असते.
स्वरूप: यामध्ये हातमाग (Handloom), यंत्रमाग (Powerloom) आणि लहान होजिअरी युनिट्सचा समावेश होतो. हे उद्योग सहसा घरांमध्ये किंवा छोट्या शेडमध्ये चालतात.
नोंदणी: यातील अनेक घटक अधिकृतरीत्या नोंदणीकृत नसतात किंवा लघु उद्योगांत मोडतात.
कामगार: येथील कामगार सहसा रोजंदारीवर (Daily wages) काम करतात. त्यांना सामाजिक सुरक्षा (PF/विमा) मिळण्याचे प्रमाण कमी असते. कामाचे तास लवचिक असले तरी रोजगाराची शाश्वती कमी असते.
उत्पादन: हे क्षेत्र स्थानिक बाजारपेठेची गरज भागवते. भारतातील एकूण कापड उत्पादनापैकी सुमारे ८०% पेक्षा जास्त उत्पादन याच क्षेत्रातून येते.
४. History of Textiles (कापड उद्योगाचा इतिहास) :-
प्राचीन काळ: मानवाने सर्वात आधी नैसर्गिक तंतूंचा (कापूस, रेशीम, लोकर) वापर करून हाताने विणकाम सुरू केले. भारतात हडप्पा संस्कृतीपासून कापड विणण्याचे पुरावे मिळतात.
औद्योगिक क्रांती (Industrial Revolution): १८ व्या शतकात ब्रिटनमध्ये वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागल्यानंतर 'पॉवरलूम'चे आगमन झाले आणि कापड उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले.
भारतातील पहिली मिल: १८५४ मध्ये मुंबईत 'बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग कंपनी'ची स्थापना झाली, जिथून आधुनिक भारतीय कापड उद्योगाची सुरुवात झाली.
५. Passage / Procedure (कार्यप्रणाली) :-
कापड निर्मितीचा प्रवास खालील क्रमाने होतो:
१. Ginnying: कापसापासून बिया वेगळ्या करणे आणि bell बनविणे.
२. Spinning: तंतूंपासून धागा (Yarn) तयार करणे.
३. Weaving Preparation (Warping/Sizing): विणकामासाठी ताणा beam तयार करणे.
४. Weaving: हातमागावर ( Handloom वर ) कापड विणणे.
५. Processing/Dyeing: कापडाला रंग देणे आणि त्यावर प्रक्रिया करणे.
६. Garmenting: कापडापासून कपडे शिवणे.
६. About Explanation (स्पष्टीकरण) :-
कापड उद्योग हा भारताचा शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा रोजगार देणारा उद्योग आहे. 'विव्हिंग टेक्निशियन' म्हणून काम करताना आपल्याला कच्च्या सुताचे रूपांतर कापडात कसे होते, हे तांत्रिकदृष्ट्या शिकावे लागते. यामध्ये यंत्रांची देखभाल (Maintenance) आणि विणकामाचे दोष (Fabric Defects) कमी करणे हे मुख्य कार्य असते.
७. Skills (कौशल्ये) :-
1. विविध प्रकारच्या तंतूंची (Fibers) ओळख पटवणे.
2. मशिनरीचे तांत्रिक स्पेसिफिकेशन समजून घेणे.
3. विणकामाच्या विविध पद्धतींचे (Plain, Twill, Satin) ज्ञान आत्मसात करणे.
4. नव्या तंत्रज्ञानानुसार (उदा. एअर जेट, वॉटर जेट लूम) स्वतःला अपडेट ठेवणे.
८. Other Essential (इतर आवश्यक माहिती) :-
GTP (Gross Textile Product): देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा सुमारे ४% आहे.
Technical Textiles: आता केवळ कपड्यांसाठीच नाही, तर रस्ते बांधणी, वैद्यकीय क्षेत्र आणि अंतराळ संशोधनासाठीही विशेष कापड (Technical Textiles) वापरले जाते.
या Lesson मधून महत्वाचे ५ प्रश्न :-
१. भारतातील पहिली आधुनिक कापड गिरणी (Mill) कधी आणि कोठे सुरू झाली?
२. कापड उद्योगातील चार मुख्य टप्पे (Value Chain) कोणते?
३. 'टेक्निकल टेक्स्टाईल' म्हणजे काय?
४. विणकाम क्षेत्रात 'संघटित' आणि 'असंघटित' क्षेत्राचा अर्थ काय?
५. औद्योगिक क्रांतीचा कापड उद्योगावर कोणता मुख्य परिणाम झाला?
Comments